1 मे रोजी स्टॉलचे भुमीपजन : आ. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
वैभववाडी | प्रतिनिधी
वैभववाडी शहरात स्टॉल बांधकाम कामाचा शुभारंभ सोमवार दि. 1 मे रोजी सकाळी 9:30 वाजता करण्यात येणार आहे. याप्रसंगी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी दिली आहे. आमदार नितेश राणे यांनी स्टॉल धारकांना दिलेला शब्द पाळला आहे. त्यांच्या वचनपुर्ती बद्दल समाधान व्यक्त होत आहे.
वैभववाडी शहरात शासकीय जागेत अतिक्रमण करून उभारण्यात आलेले स्टॉल नगरपंचायतीच्या वतीने हटविण्यात आले होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांची स्टॉल धारकांनी भेट घेतली होती. आमदार नितेश राणे यांनी स्टॉल धारकांना स्टॉल बांधून देणार असा शब्द दिला होता. दिलेला शब्द आमदार नितेश राणे यांनी पाळला आहे. शहरात नियोजनबद्धरित्या स्टॉल बांधण्यात येणार आहेत. या बांधकामाचा शुभारंभ सोमवार दि. 1 मे रोजी होणार आहे. अशी माहिती माईणकर व सावंत यांनी दिली आहे.
यावेळी न. पं. बांधकाम सभापती विवेक रावराणे, शिक्षण आरोग्य सभापती यामिनी वळवी, नगरसेविका सुंदराबाई निकम, नगरसेवक राजन तांबे, सुनील भोगले आदी उपस्थित होते.