▪️नवनिर्वाचित जि.प.,पं.स.सदस्यांचा सत्कार.

मसुरे | झुंजार पेडणेकर पोईप येथील सौ.इं .द. वर्दम हायस्कूल साठी खास.नारायणराव राणे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सहा वर्गखोल्यांचे भुमीपुजन नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या पोईप सुकळवाड,पेंडूर, मसुरे मतदार संघातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार दत्ताजी सामंत, संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या मध्ये सुकळवाड मतदार संघातील जि.प. सदस्या सौ.सुमेधा संतोष पाताडे,पं.स. सदस्या सौ प्रज्ञा भाऊ चव्हाण,पेंडूर जि.प.मतदार संघातील जि प. सदस्य संतोष साटविलकर, सुकळवाड पं.स. सदस्य संतोष दत्तात्रय गावडे, वायरी भुतनाथ सदस्या सौ अक्षता राजन गावडे, मसुरे पं.स. सदस्य संजय उर्फ छोटू ठाकूर इत्यादींचा सत्कार करण्यात आला.याच वेळी वर्दम हायस्कूलच्या १०वी मधील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ हि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांच्या सह पोईप वर्दम हायस्कूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कांदळकर, मालवण तालुका प्रमुख मंदार लुडबे, तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम, सरपंच श्रीधर नाईक, महेंद्र पालव, विश्वनाथ पालव, श्रीकृष्ण तेली, बबलु वेंगुर्लेकर,राजु गावडे, रामचंद्र सातार्डेकर, उद्योजक दया देसाई, विलास माधव, संदिप सावंत, भाऊ चव्हाण, बाबुराव चिरमुले, महेश पालव, चांदोस्कर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते, विद्यार्थी पालक, विद्यार्थी, शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.
वर्दम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज च्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर आणि व्यवस्थापकीय संचालक समिती यांनी आजवर घेतलेले परिश्रम आणि शैक्षणिक कार्य कौतुकास्पद आहे . शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता, विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उत्तम प्रकारच्या उपलब्ध करून देण्यात व दरवर्षी १००%निकालाची परंपरा असलेल्या या प्रशालेचे नाव संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आघाडीवर आहे याचा आपल्याला अभिमान आहे असे गौरवोद्गार दत्ता सामंत यांनी काढले. तर आपल्या महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करुन जिल्हा परिषद पंचायत समिती वर सत्ता मिळवून दिल्या बद्दल सर्वांचे जाहीर आभार मानले. निवडून आलेल्या जि.प.,पं स. सदस्यांचे सत्कार पर अभिनंदन करून आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेतून आपापल्या मतदारसंघात विकासकामे करुन आपल्यावर जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावावी असे आवाहन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











