गावखडी श्री स्वामी समर्थ मठात श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी देवाची पालखीचे बुधवारी गावखडी येथे आगमन

गावखडी /वार्ताहर
श्री क्षेत्र अक्कलकोट येथुन श्री स्वामी देवांची पालखी परिक्रमा – मुळ पादुका, श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ गांवखडी येथे बुधवार दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९-०० वाजता येणार आहेत. दर्शनाची वेळ स.०९-३० ते दु.०३-३० पर्यंत आहे. दुपारी १२-०० वा. श्री स्वामी देवांना नैवेद्य अर्पण करून महाआरती होतील. त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल तरी सर्व भक्तगणांनी मठामधे उपस्थित राहून या पालखीसोहळ्यामधे सहभागी होऊन श्री स्वामी देवांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ गांवखडी व श्री स्वामी समर्थ दिगंबर चँरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व श्री स्वामीभक्तांनी व मठातील सर्व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी देवांच्या स्वागतासाठी सकाळी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे