मंडणगड प्रतिनिधी :- सार्वजनिक धामणे ग्रामस्थ मंडळ मुंबई /ग्रामीण (रजि) संलग्न ऐ-वन क्रिकेट संघ आंबवणे गाव यांच्यावतीने आई जाखमाता देवी चषक- 2026 चे 15 फेब्रुवारी 2026 रोजी रोजी घाणीचा तलाव विरार इथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आय़ोजन करण्यात आले होते. स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील आणि रायगड जिल्यातील 16 संघ सहभागी झाले होते. ग्रुप ग्रामपंचायत शिगवण सदस्य सौ. विमल धामणे मंडळाचे सदस्य श्री प्रमोद धामणे यांच्याहस्त फित कापून व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेसाठी सार्वजनिक धामणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री महादेव धामणे, आगरी सेना पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री विजयमामा घरत, उपअध्यक्ष केशव खेरटकर उपखजिनदार विनायक धामणे, माजी अध्यक्ष सुनिल बांद्रे, शिवसेना तालुका संघटक मंडणगड शंकर बांद्रे , माजी सरपंच किरण धामणे, विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शिगवण योगेश धामणे, माजी सेक्रेटरी मनोहर घरटकर, चंद्रकांत खेरटकर, महेश बैकर, सचिन होडबे, मनोज धामणे, महेंद्र धामणे, गणेश सुतार, अनंत खेरटकर, महेंद्र धामणे, कल्पेश खांबे, सुदाम धामणे, शैलेश खेरटकर, नितेश धामणे यांची उपस्थित व सहकार्य लाभले सर्व मान्यवरांनी ही स्पर्धा यशस्वी रित्या पाडण्यासाठी मंडळास सहकार्य लाभले. नितेश धामणे ह्यांनी स्पर्धचे प्रेक्षपण लाईव्ह करण्यासाठी एन.पी.एन. स्पोटर्स चे खुप सहकार्य केल. समालोचक धनंजय पाटील आणि श्री. पेढारी साहेब ह्यांनी आपल्या मंत्रमुग्ध गोड आवाजाने स्पर्धची वाढवली शोभा डी.जे. सुमीत यांनी च्या आवाजाने संपूर्ण मैदान आनंदमय केला. प्रमोद धामणे आणि अनिल धामणे ह्यांनी सर्व खेळांडून अल्पोपहार दिला. स्पर्धेत म्हाप्रळ संघाने प्रथम पारितोषिक कालिंजे संघाने व्दितीय पारितोषिक खामगाव संघाने तृतीय पारितोषिक गुडेघर संघाने चतुर्थ पारितोषिक मिळवीले. सर्व विजयी संघांचे आयोजकानी अभिनंदन केले. संपूर्ण स्पर्धा ही अतिशय खेळीमेळीच्या आणि मोठया आनंदाच्या वातावरणात तसेच शिस्तबध्य पद्धतीने पार पडली ऐ-वन क्रिकेट संघ आंबवणे बुद्रुक व ग्रामस्थांनी या करिता मेहनत घेतली.












