गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन च्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावरती मनाचे श्लोक पठण स्पर्धेत राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. समर्थ भारत अभियान सज्जनगड संस्थान च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये इयत्ता १० वी ला शिकणाऱ्या दिव्या दयानंद जड्यार हि राज्यस्तरावर प्रथम आली आहे.तर आदिती सुरेश कातकर हि द्वितीय आली आहे.तर विदिता मिलिंद मोने व कल्याणी सचिन साठे ह्या दोघीना राज्यस्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
तर खुल्या गटातून प्रशालेतील प्रयोगशाळा सहाय्यक सचिन विष्णू साठे यांना राज्यस्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.ही स्पर्धा नुकतीच पुणे येथे झाली.
यशस्वी झालेल्या सर्व स्पर्धकांची तयारी सचिन साठे यांनी करून घेतली होती.दरम्यान या यशस्वितांचे प्रशालेत अभिनंदन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक महादेव परब,संस्था सहसचिव दीपक शिगवण,शिक्षक प्रतिनिधी महादेव शिंदे व अन्य शिक्षक उपस्थित होते.
शालेय,जिल्हा स्तर पार करत,राज्यस्तरावर क्रमांक पटकावल्याने परिसरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थी व प्रयोग शाळा सहाय्यक सचिन साठे यांचे मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे, संस्था अध्यक्ष किशोर साठे व अन्य संचालकांनी अभिनंदन केले आहे.












