सावंतवाडी l प्रतिनिधी :विश्वहिंदू परिषद व बजरंगदल सावंतवाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ ते गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्रीकृष्ण आनंदवन गोशाळा, तुकुली येथे नवीन गोठ्याच्या शेडचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सावंतवाडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व पुतळ्यांचे पूजन करण्यात येईल. सकाळी १० वाजता शासकीय रुग्णालयात फळवाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली कोकण कॉलनी, काझरकोड, बाहेरचा वाडा मार्गे गांधी चौक येथे येऊन पोहोचेल.
सायंकाळी ७ ते ८ या वेळेत प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन होणार असून रात्री ८ ते १० या वेळेत पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक श्री नितीनजी महाजन तसेच पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा श्री नितेशजी राणे उपस्थित राहणार आहेत.
सदर सोहळा गांधी चौक, सावंतवाडी येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











