किल्ले सिंधुदुर्ग शिवराजेश्वर मंदिरात आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत साजरा होणार शिवजयंती उत्सव 

मालवण | प्रतिनिधी : शिवसेनेच्या वतीने वतीने गुरूवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सिंधुदुर्ग किल्ला येथील शिवराजेश्वर मंदिरात आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

 

तरी मालवण तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, जि.प सदस्य, पं स सदस्य, नगरसेवक, महिला पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, शिवप्रेमी यांनी सकाळी 9 वा. मालवण बंदरजेठी येथे उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, तालूकाप्रमुख विनायक बाईत,

मालवण नगराध्यक्ष सौ. ममता वारडकर, शहर प्रमुख उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, महिला तालूकाप्रमुख मधुरा तुळसकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना तालुका प्रमुख अभी लाड, शहर संघटक राजू बिडये यांच्या वतीने करण्यात आले आहे.