रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा पोलिस भरतीच्या चौथ्या दिवशी मंगळवारी 1027 महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यातील 789 उमेदवार भरतीसाठी हजर होत्या. त्यातील 101 उमेदवार अपात्र ठरल्यामुळे पात्र ठरलेल्या 688 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. तर 238 महिला उमेदवार या पोलिस भरतीसाठी गैरहजर राहिल्या होत्या.
शिपाई आणि चालक शिपाईच्या 108 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु आहे. सकाळी 5.30 वा.पासून मिरजोळे एमआयडीसी येथील क्रिडा संकुलात या भ्ारती प्रक्रियेला सुरुवात होते. यावेळी प्रथम मैदानी चाचणी घेण्यात येत असून चौथ्या दिवशी मंगळवारी एकूण 1027 महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी केवळ 789 उमेदवारच भरतीच्या ठिकाणी हजर होते. त्यातील 101 महिला उमेदवार पोलिस भरतीच्या नियमात बसत नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. उर्वरित 688 महिला उमेदवारांची 1600 मिटर धावणे,100 मिटर धावणे आणि गोळा फेक या तिन प्रकारच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या













