स्वराज्य मित्र मंडळ, माठेवाडा
कुडाळ :-
कुडाळ तालुक्यातील स्वराज्य मित्र मंडळ, माठेवाडा कुडाळ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दोन दिवस चालणारा सांस्कृतिक व धार्मिक सोहळा कुडाळ शहरात पार पडणार आहे.
गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शिवजन्म सोहळ्याने कार्यक्रमांची सुरुवात होणार असून सकाळी १०.३० वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम संपन्न होईल. सायंकाळी ४ वाजता खेळ पैठणीचा सन्मान सोहळा तसेच नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता पारंपारिक वेशभूषा स्पर्धा होणार असून रात्री ९.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. कीर्तन चूडामणी श्री. संदीप मांडके (रामदासी, पुणे) यांचे “शिवजन्म आणि हिंदवी स्वराज्य निर्मिती” या विषयावर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमी, कुडाळ यांच्या प्रस्तुत “नृत्यरंग” हा पारंपारिक नृत्याविष्काराचा कार्यक्रम सादर होणार आहे.
शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन स्वराज्य मित्र मंडळ, माठेवाडा कुडाळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.












