मसुरे | झुंजार पेडणेकर
मुणगे येथील रिक्षा चालक-मालक संघ, व्यापारी आणि मित्रमंडळ यांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती आणि श्री सत्यनारायण महापूजेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. श्री देवी भगवती मंदिर परिसरात हा सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे.
सकाळी ९:०० वाजता शिवजयंती कार्यक्रम,
सकाळी ९:३० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी 11 वा. आरती व तीर्थप्रसाद,
दुपारी १२ ते ३ वा.महाप्रसाद (भंडारा).
रात्री 9.30 वाजता ‘आमने-सामने २०-२० डबलवारी’ भजनाचा सामना बुवा श्री. श्रीकांत शिरसाट (ओम चैतन्य गगनगिरी प्रासादिक भजन मंडळ, उंबर्डे-वैभववाडी)
विरुद्ध बुवा श्री. प्रथमेश चव्हाण (श्री. राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, फोंडाघाट-कणकवली)यांच्यात होणार आहे.
पखवाजवर श्री. अमोल पांचाळ व श्री. सुहास सुतार, तर तबल्यावर श्री. प्रेम मेस्त्री व श्री. लोकेश सोलकर साथसंगत करणार आहेत. सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन रिक्षा चालक-मालक संघ, व्यापारी आणि मित्रमंडळ, मुणगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.












