नाटे : दारूच्या नशेत तरुणाची कुमयाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

राजापूर : राजापूर तालुक्यातील अणसुरे आडीवाडी येथे एका ३० वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पांडुरंग दत्ताराम कणेरी (वय ३०, रा. अणसुरे आडीवाडी, ता. राजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस अहवालानुसार, पांडुरंग याला दारूचे व्यसन होते. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास त्याने दारूच्या नशेत अणसुरे आडीवाडी येथील चिरेखाण भागात एका कुमयाच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून घेतला. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.