सुनील मोदींची स्वीकृत नगरसेवक पदी निवडमुळे उबाठा गटात नाराजी

शिवसैनिकांचा घरासमोर राडा…

महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत नाराजी

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: महानगरपालिका मधे स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडी चालू आहेत.यादरम्यान शिवसेना उबाटा गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्मण झाला आहे. या निवडीनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मोदी यांना जाब विचारत घरासमोर राडा घातला आहे. यात्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

परिवहन समितीमध्ये विशाल देवकुळे यांचे नाव डावल्यानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गोंधळ घातला आहे. त्यानंतर सुनील मोदी यांनी तुम्ही शिवसेनेचा घात केला, शिवसेनेत राहून तुम्ही काँग्रेसचे हस्तक झाला आहात, कोल्हापुरातून उद्धव ठाकरेंची शिवसेना मोदी तुम्ही संपवली असा आरोप करण्यात आला.

जाब विचारण्यासाठी गेलेल्या विशाल देवकुळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदींना खडे बोल सुनावले.घरात तुम्ही गुलाल धुवून या, मग शिवसैनिकांशी बोलणी करा, येथून पुढे काँग्रेससोबत कोणतीही आघाडी करणार नाही. काँग्रेसने नेहमीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा उपयोग केला, असल्याचा आरोप यावेळी (उबाटा)शिवसैनिकांनी केला आहे.