तिलारी शेटवेवाडीचे सुपुत्र साहिल शेटवे यांचे ‘नवी मुंबई मेट्रो’मध्ये निवड
दोडामार्ग (प्रतिनिधी):
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी शेटवेवाडी येथील तरुण साहिल शरद शेटवे याची NMML-1 (नवी मुंबई मेट्रो) मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. साहिलच्या या यशामुळे शेटवे कुटुंबासह संपूर्ण तिलारी शेटवेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाचे औचित्य साधून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी साहिलच्या निवासस्थानी भेट देऊन त्याचे विशेष अभिनंदन केले. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते शैलेश दळवी, प्रेमानंद देसाई, प्रवीण गवस, विनायक शेटये आणि ज्ञानेश्वर शेटवे यांचा समावेश होता.
वडिलांच्या कष्टाचे आणि निष्ठेचे फळ
साहिल हा कै. शरद शेटवे यांचा सुपुत्र आहे. कै. शरद शेटवे यांची परिसरात ‘कट्टर राणे समर्थक’ म्हणून ओळख होती. त्यांच्या निधनानंतर साहिलने अवघ्या २२ व्या वर्षी अत्यंत जिद्दीने अभ्यास आणि मेहनत करून हे यश संपादन केले आहे.
साहिल आता नवी मुंबई मेट्रोच्या सीबीडी बेलापूर ते पेणधर या मार्गावर (NMML-1) आपली सेवा बजावणार आहे. ग्रामीण भागातील एका तरुणाने मेट्रोसारख्या आधुनिक प्रकल्पात स्थान मिळवणे, ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.
“साहिलने मिळवलेले हे यश त्याच्या मेहनतीचे आणि कै. शरद शेटवे यांच्या संस्कारांचे प्रतीक आहे. तिलारीतील तरुणांसाठी तो एक प्रेरणास्त्रोत ठरला आहे.”
अशा भावना ग्रामस्थांतून व्यक्त होतं आहे












