▪️श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्मपादुकांचे होणार आगमन
मसुरे | झुंजार पेडणेकर
कुडाळ तालुक्यातील कसालच्या-घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना ९ व्या वर्धापनदिनानिमित्त २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महालक्ष्मी श्री सुक्त याग व विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री वेदमुर्ती नितीन पुजारी (चोळप्पा महाराज यांचे ५ वे वंशज), ब्रह्मवृद व श्री गुरुवर्य दादा माऊली यांच्या मार्गदर्शनाने ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता परिवार श्री स्वामी समर्थ मठ घावनळे-कासमळा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव कालावधीत दररोज दुपारी १२ ते ३ या.व रात्री ८ ते १० वा. महाप्रसाद, सायं. ४ ते ६ वा. कीर्तन, भजन व नामस्मरण, सायं. ७ वा. आरती असे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार २० रोजी दु. २ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्मपादुकांचे आगमन व भव्य मिरवणूक, रात्री ८ वा. श्री सातेरी देवी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी यांचा ‘भक्ताची पाठीराखी आदिमाया’ हा नाट्यप्रयोग झाला. शनिवार २१ रोजी स. ९ वा. महालक्ष्मी श्री सुक्त यागनिमित्त महासंकल्प, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, होम देवता स्थापना, श्री स्वामी समर्थ मूळ चर्मपादुका पूजन, अग्निस्थापना , महानेवेद्य व आरती होणार आहे. रात्री ८ वा. डबलबारी भजन सामना बुवा संतोष शीतकर (दिवा – ठाणे) विरुद्ध सुशील गोठणकर (भांडुप-मुंबई) यांच्यात होणार आहे. रविवार २२ रोजी स. ९ वा. होम देवता पूजन, श्री स्वामी समर्थ मूळ चर्मपादुका पूजन, नवग्रह हवन, गणेश हवन, महालक्ष्मी हवन, महानेवेद्य व आरती होईल. सायं. ७ वा. हरिपाठ आणि रात्री ८ वा. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा ‘लेक माझी तुळजाभवानी’ हा नाट्यप्रयोग.
सोमवार २३ रोजी स. ९ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीना वर्धापन दिनानिमित्त महास्नानाभिषेक, महालक्ष्मी हवन, स्वामी गायत्री हवन, महानेवेद्य व आरती होईल. सायं. ६ वा. तबला सोलो (तबला मयंक बेडेकर), ७ वा. पालखी सेवा आणि रात्री ९ वा. श्री देव कलेश्वर नाट्यमंडळ नेरुरचे ‘जोगुलंबा अर्थात कालसर्प भैरवी ’ हा ट्रीकलरीयुक्त नाट्यप्रयोग. मंगळवार २४ रोजी स. ७ वा. श्री स्वामी समर्थ मूळ चर्मपादुका पूजन, होम देवता पूजन, ९ वा. प्रायश्चित हवन, बलिपूजन, पूर्णाहुती, महानेवेद्य व आरती होईल. रात्री ८ वा. दशावतार नाट्यप्रयोग. बुधवार २५ रोजी स. ७ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्मपादुकांचा सामूहिक भक्तांच्याकडून अभिषेक, ९ वा. गंगा पूजन व कुंभमेळा. रात्री ८ वा. श्री सातेश्वर नाट्यमंडळ (आंबेरी) यांचा ‘श्री क्षेत्र गाणगापूर’ नाट्यप्रयोग. गुरुवार २६ रोजी स. १० वा. कार्यक्रमाची सांगता निमित्त श्री सत्यनारायण महापूजा, महानेवेद्य व आरती होणार आहे. सायं. ६ वा. पालखी सेवा, रात्री ७ वा. गोपाळ काला, ८ वा. जय हनुमान नाट्यमंडळ (आरोस दांडेली ) यांचा ‘दखनचा राजा जेतिबा माझा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ जगदंमाता परिवार, कासमळा घावनळे यांनी केले आहे
.












