कवी राजेंद्र ठाकूर यांच्या ‘ माझे माहेर आंगणेवाडी ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन! 

मसुरे | झुंजार पेडणेकर        :डांगमोडे येथील संवेदनशील कवी राजेद्र विठ्ठल ठाकूर यांचा आपल्या आईचे  माहेर असलेल्या  आंगणेवाडीच्या आठवणींचा मागोवा घेणारे “माझे माहेर आंगणेवाडी ‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आंगणेवाडी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. छोटू आंगणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. आपल्या आईचा माहेरचा जीवन प्रवास कवीने  या कवितांमधुन अधोरेखित केला आहे.

या काव्यसंग्रहात आईची महती, तिच्या लहानपणीच्या आठवणी, तिच्या माहेरच्या आणि सासरच्या संदर्भातल्या काही घटना यांचा कवितांच्या माध्यमातून आढावा घेतला आहे. या केवळ कवीच्या आईच्या किंवा त्या त्या गावाच्या आठवणी नसून अवघ्या कोकणच्या एके काळच्या आठवणी आहेत. या कविता म्हणजे त्या आठवणींच्या कॅमेऱ्यातून उतरलेला कवितांचा अल्बमच म्हणावा लागेल असे यावेळी मान्यवरानी गौवोदगार काढले.

काव्यसंग्रह निर्मितीसाठी सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशनचे संचालक, प्रकाशक श्री. सुभाष मनोहर कुदळे , श्री. निशिकांत गोवर्धन महांकाळ, श्री. सुशांत दोडके यांनी अनमोल सहकार्य केले. प्रकाशन प्रसंगी श्री. बाळा आंगणे, श्री.संदिप आंगणे, श्री.विलास आंगणे, श्री.दिपक आंगणे, श्री.

दिनेश आंगणे, श्री.अनिल कावले, श्री. हेमंत ठाकूर आणि कुटुंबिय उपस्थिती होते.