आम. निरंजन डावखरे यांनी घेतले स्वामी समर्थांचे आशीर्वाद!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पुज्य सदगुरू श्री गावड़ेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री सदगुरू भक्त सेवा न्यास रजि.

संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे – वडाचापाट, मालवण, सिंधुदुर्ग येथे आमदार निरंजन डावखरे यांनी नुकतीच भेट देऊन स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे प. पु. गावडेकाका महाराज यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गावडे, सिद्धेश किनळेकर,राजु वाळके, राजेश प्रभुलकर, अनिल घाडीगांवकर, विश्वस्त साई पेडणेकर, तानाजी पाटील, श्री श्रीकृष्ण पाटकर,दिलीप सुतार , श्रीतोंडवळकर,श्री मुणगेकर आदी उपस्थित होते. श्री भराडी देवी आंगणेवाडी वार्षिक जत्रौउत्सव निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाना श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे प्रति वर्षां प्रमाणे विना मुल्य सेवा आंघोळीसाठी गरम पाणी, सकाळी चहा नाष्टा, दुपारी – जेवण(महाप्रसाद-अन्नदान) आणि सायंकाळी – चहा, अल्पआहार सेवा भाविकांना दिल्या बद्दल त्यांनी गौरवोदगार काढले.