रत्नागिरी ः प्रतिनिधी
अश्लिल भाषा व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून दाम्प्त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ही घटना 8 डिसेंबर 2019 रोजी शहरातील पऱ्याची आळी येथे घडली होती.
रणधिर विजय शेट्ये व मेधा विजय शेट्ये (रा.पऱ्याची आळी,रत्नागिरी) असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या दाम्प्त्याचे नाव आहे. या दोघांनी फिर्यादीला 8 डिसेंबर 2019 रोजी शहरातील पऱ्याची आळी, विठ्ठल मंदिराच्या मागे अश्लिल भाषा व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकि दिली होती. याबाबत फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 509,294,352,506, व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा खटला न्यायालयात सुरु होता. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात चार साक्षिदार तपासण्यात आले होते. त्यांचा उलट तपास संशयित आरोपींच्यावतीने ॲड.संदिप ढवळ यांनी केला.उलट तपासात महत्त्वाच्या कबुली साक्षिदारांकडून घेण्यात आल्या होत्या. संशयित आरोपींच्या वकिलाने केलेला युक्तिवाद व केस लॉ विचारात घेउन न्यायालयाने संशयितांची भादंवि कायदा कलम 509,294,352,506, व 34 मधून निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात संशयित आरोपींच्या वतीने ॲड.संदीप ढवळ,ॲड अमित सोलकर,ॲड.पंकज बाणे,ॲड शैलेश नावले व ॲड.शुभम आयरे यांनी काम पाहिले.










