तुळस येथील भजन स्पर्धेत श्री देव इसोटी प्रा. भजन मंडळ, मातोंड प्रथम…

जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा उत्साहात संपन्न….

वेंगुर्ले : दाजी नाईक
तुळस येथे श्री जैतिराश्रित भजनप्रेमी, तुळस तर्फे भव्य जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेत श्री देव इसोटी प्रा. भजन मंडळ, मातोंड यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. जिल्ह्यातील एकूण चौदा भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेत भक्तीमय वातावरण निर्माण केले.

स्पर्धेसाठी सहभागी मंडळापैकी श्री देव इसोटी प्रा. भजन मंडळ, मातोंड प्रथम, श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रा. भजन मंडळ, जानवली, कणकवली द्वितीय, गुरुकुल संगीत भजन मंडळ, कुडाळ तृतीय क्रमांक पटकवला तर गुरुकृपा भजन मंडळ न्हावेली घोडेमुख उत्तेजनार्थ प्रथम, हेळेकर प्रासादिक भजन मंडळ, कारिवडे उत्तेजनार्थ द्वितीय आणि श्री देवी भावई प्रसादिक भजन मंडळ झाराप उत्तेजनार्थ तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

वैयक्तिक पारितोषिके
उत्कृष्ट गायक व हार्मोनिअम श्री. योगेश मेस्त्री,
उत्कृष्ट पखवाज श्री. शुभम गावडे
उत्कृष्ट तबला श्री. सुरज पालव
उत्कृष्ट मंजिरी श्री. अभि भगत,
उत्कृष्ट अभंग श्री रोहित निर्गुण,
उत्कृष्ट कोरस श्री देव इसोटी प्रा. भजन मंडळ मातोंड सावंतवाडा
तर शिस्तबद्ध संघ श्री हेळेकर प्रा. भजन मंडळ कारिवडे यांना प्राप्त झाला.

स्पर्धेस प्रमुख पाहुणे तुळस गावाचे प्रथम नागरिका सरपंच सौ. रश्मी परब, नवनिर्वाचित पं. स. सदस्य श्री. शंकर घारे, ग्रा. पं. सदस्य श्री. जयवंत तुळसकर, श्री. रुपेश कोचरेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन लिंगोजी, देवस्थान मानकरी श्री. बाळू राऊळ, श्री. बाबा राऊळ, छ. शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. शामसुंदर उर्फ तुषार राय, पुरोहित व सामाजिक कार्यकर्ते श्री. अवधूत मराठे, पोलिसपाटील श्री. सागर सावंत, बुवा श्री. वैभव परब, परीक्षक श्री. मोहन मेस्त्री सर, परीक्षक श्री. स्वप्नील गोरे सर, बुवा श्री. पुरुषोत्तम परब आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ नवनिर्वाचित जि. प. सदस्या सौ. सुजाता अजित पडवळ, राष्ट्रवादी कॉ. वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री. संदीप उर्फ दाजी पेडणेकर, पोलिसपाटील श्री. सागर सावंत, सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन लिंगोजी, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय रेडकर, बुवा श्री वैभव परब, श्री. बंड्या होडावडेकर, श्री. गोपाळकृष्ण लिंगोजी आणि परीक्षक श्री. स्वप्नील गोरे सर वं श्री. मोहन मेस्त्री सर यांच्या हस्ते झाला.

परीक्षक म्हणून श्री. मोहन मेस्त्री, श्री. स्वप्नील गोरे यांनी काम पाहिले. त्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांचाही श्री जैतिराश्रित भजनप्रेमी तुळस यांच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्यांनी आर्थिक व वस्तू स्वरूपात सहकार्य केले त्या सर्व प्रायोजक व देणगीदार यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. सलील लिंगोजी यांनी केले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व जैतिराश्रित भजनप्रेमी, तुळस चे सदस्य तसेच हितचिंतक, देवस्थान समिती, तुळस ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

या संपूर्ण स्पर्धेचे ध्वनीचित्रिकरण PKProductionPravinKandalkar या Youtube चॅनेल वर यथावकाश उपलब्ध करण्यात येतील.
भक्तिरसाने ओथंबलेल्या या स्पर्धेमुळे तुळस श्री देव रामेश्वर मंदिर परिसर भक्तिमय झाला.