कोकण परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर
देवगड प्रतिनिधी
कोकण परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांनी जारी केले आहेत.
जारी आदेशानुसार पोलीस निरीक्षक भरत गोविंद धुमाळ यांची सिंधुदुर्ग येथून रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रमेश बामन्या तडवी यांची रायगड येथून ठाणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश प्रकाश चिकणे यांची सिंधुदुर्ग येथून रायगड येथे बदली करण्यात आली आहे.
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांची रायगड येथून ठाणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक तानाजी वाघमोडे यांची रायगड येथून ठाणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम यांची रत्नागिरी येथून सिंधुदुर्ग येथे बदली करण्यात आली आहे.
संबंधित विभाग प्रमुखांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून नव्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मा. न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आदेशाच्या अधीन राहूनच या बदल्या लागू राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.












