उभादांडा येथील गणपतीचे २६ फेब्रुवारी रोजी विसर्जन..

वेंगुर्ले l दाजी नाईक :

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावातील श्री. गणपती मंदिरात दिवाळी मध्ये लक्ष्मी पूजनादिवशी स्थानापन्न झालेल्या श्री. गणपतीचे विसर्जन होळी पौर्णिमेच्या अगोदर गुरुवार दि.२६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ढोलताशे व भजनाच्या गजरात सागरेश्वर समुद्र किनारी होणार आहे.

तत्पूर्वी बुधवार दि.२५ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद (म्हामणे) होणार आहे. तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.