नगराध्यक्ष ममता वराडकर व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नाट्यगृहाची केली पाहाणी
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून दर्जेदार सुविधा देणार
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह येथे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगरसेवक व प्रशासना सोबत पाहाणी केली. पदाधिकारी नगरसेवक यांच्या उपस्थितीत पाहाणी दरम्यान नाट्यगृह देखभाल दुरुस्ती व सुविधा दृष्टीने आवश्यक सूचना प्रशासनास करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षात नाट्यगृहात असुविधा निर्माण झाल्या. मात्र दर्जेदार नाट्यगृह असावे या दृष्टीने असुविधा दूर केल्या जातील. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राप्त निधीतून नाट्यगृहात अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जातील. अशी माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेविका नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, अनिता गिरकर, नगरसेवक मंदार ओरसकर, यांसह पालिका अधिकारी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान नाट्यगृहातील आसनव्यवस्था, दरवाजे, एसी, पंखे, लाईट व इमारत परिसर आदी सुविधांची पाहाणी करण्यात आली. आवश्यक त्या दुरुस्त्या तातडीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. संपूर्ण परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने सफाई कर्मचारी यांच्या नियुक्ती बाबत आदेश देण्यात आले.
नाट्यगृहात असुविधा असता नये यासाठी प्रशासनाने योग्य लक्ष ठेवावे. स्वच्छता दृष्टीने काटेकोर नियोजन करावे. त्या सोबत नाट्यगृहात सुविधा वाढवण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात नियोजन सुरु आहे. याबाबत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.










