सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानप्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता

कुडाळ : कुडाळ-आंबेडकर नगर ते कुडाळ रेल्वे स्थानक रस्त्याचे काम सुरू असताना सार्वजनिक मालमत्तेस आग लावून नुकसान केल्याप्रकरणी आरोपी समीर नाना कुडाळकर याच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीस कलम ३ व ४ सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम, १९८४ अन्वये अटक करण्यात आली होती.

सदर प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान ॲड. राजीव बिले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी आरोपीस १५ हजार रुपयांच्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. दत्ताराम बिले, ॲड. हेमांगी वराडकर तसेच ॲड. तेजस सावंत यांनी काम पाहिले.