कथासंग्रह परीक्षणात शिरोडा येथील स्नेहा नारींगणेकर प्रथम…

साहित्यिक कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम…

वेंगुर्ले l प्रतिनिधी :आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्या तर्फे जानेवारी महिन्यापासून ‘साहित्यिक कै.कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम’ राबवला जात आहे. सहभागी तेरा वाचक दरमहा एक पुस्तक वाचून त्यावर परिक्षण लिहीत आहेत. जानेवारीतील ‘कथासंग्रह’ या साहित्य प्रकारात शिरोड्यातील स्नेहा धोंडू नारींगणेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर प्रा.नीलम कांबळे यांना द्वितीय व अरुण धर्णे आणि शेखर पणशीकर याना तृतीय क्रमांक मिळाला. स्नेहा नारींगणेकर यांनी वि.स.खांडेकर यांच्या ‘क्षितिज स्पर्श’या कथासंग्रहाचे परिक्षण केले आहे.

 

या उपक्रमांतर्गत प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी शंकर पाटील यांचा ‘वळीव’, सरोज रेडकर यांनी मोहन काळें यांचा ‘पळस फुलला’, अरुण धर्णे यांनी मधु मंगेश कर्णिक यांचा ‘तहान’, नीलम कांबळे यांनी कृष्णा पाटील यांचा नियतीचे खटले, राजेश वैज यांनी जयंत साळगावकर यांचा ‘वांग्याचे भरीत’, जयदीप देशपांडे यांनी विजय ना. कापडी यांचा ‘मान ना मान, मै तेरा मेहमान’, सोमा गावडे यांनी व.पु. काळे यांचा ‘चतुर्भुज’, वैभवी रायशिरोडकर यांनी हरिश्चंद्र पाटील यांचा ‘संस्कार फुले’ शेखर पणशीकर यांनी सोनाली परब यांचा ‘ओळख’, सायली लोणे यांनी कुंदा कवळेकर यांचा ‘ही वाट दूर जाते’,अर्चना लोखंडे यांनी रणजित देसाई यांचा ‘मेघ’ आणि विनय सौदागर यांनी व्यंकटेश माडगूळकर यांचा ‘हस्ताचा पाऊस’ अशा तेरा कथासंग्रहाचे परिक्षण करण्यात आले.

 

कुडाळ येथील चोखंदळ वाचक प्रसाद रेगे यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमासाठी मांद्रे-गोवा येथील साहित्यिक प्रा. गजानन मांद्रेकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले,तर विनय सौदागर यांनी संयोजकाचे काम पाहिले.