इन्सुली येथे कॅनॉल पाइपांना भीषण आग

कारण अद्याप अस्पष्ट

बांदा : प्रतिनिधी 

इन्सुली येथील तिलारी कालवा प्रकल्पांतर्गत कॅनॉलसाठी ठेकेदाराने डंप करून ठेवलेल्या पाइपांना आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच मोठा भडका घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले.

 

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, पाइपांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून अधिक तपास सुरू आहे.