वायंगणी येथील विवाहिता मृत्यू प्रकरणी सखोल तपास सुरु
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायंगणी दुखंडे वाडी येथील बेपत्ता विवाहित महिला अंतरा हर्षद दुखंडे (वय 28) यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास सुरु आहे.
अंतरा यांचा मृतदेह कालावलं पुलाखाली आढळून आला होता. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे श्वान पथक आले. तिथून श्वान पथक मृत महिलेच्या घराजवळ पोहचले व घुटमळले. सोबतच अधिक तपास दृष्टीने फॉरेन्सिक पथकही आले होते. त्यांच्या माध्यमातून तपास सुरु होता.
अंतरा यांच्या सोबत असलेली बॅग पोलीसांना तपासा दरम्यान सापडली आहे. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागाय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस अधिक तपास करतं आहेत. सर्व दृष्टीने सखोल तपास सुरु आहे. काही जबाब नोंदणीही करण्यात आली आहे. तसेच परिसरातील कॉल लोकेशन व अन्य दृष्टीने तपास प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. अंतरा यांचा मृतदेह सापडल्या नंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.












