प्रधानमंत्री आवास मध्ये करूळचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
वैभववाडी l प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास (घरकुल ) योजना अंतर्गत सर्वोस्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये वैभववाडी तालुक्यातील करुळ ग्रामपंचायतीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. या उल्लेखनीय यशाबद्दल बेलापूर नवीमुंबई येथे आयोजित कार्यक्रमात कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार देवून करुळ ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना सरपंच नरेंद्र कोलते, ग्रामविकास अधिकारी शशिकांत गुरव व पदाधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना मध्ये करूळ ग्रामपंचायतीने उल्लेखनीय काम केले आहे. जवळपास 22 घरकुले मागील दोन वर्षात पूर्ण केली आहेत.
या ग्रामपंचायत ने यापुर्वी बायोग्यास बांधणी मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक तसेच स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळविले आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत या ग्रामपंचायत च्या वतीने विविध नावीन्य पूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.












