गट नोंदणीचे ठराव पत्र सर्व सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले सादर
मालवण | प्रतिनिधी : मालवण पंचायत समिती स्तरावरील भारतीय जनता पार्टी पक्षीय गटाची स्थापना करण्यात आली आहे. गटनेते पदी दिपक सुर्वे तर उपगटनेते पदी योजना कांबळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व सदस्य यांच्या उपस्थित याबाबतचे ठराव पत्र जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. याबाबत माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.
यावेळी गटनेते तथा चिंदर पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, आडवली-मालडी पस सदस्य सीमा परुळेकर, वराड पस सदस्या माधुरी मसुरकर, वायरी भुतनाथ पस सदस्य घन:श्याम झाड, सुकळवाड पस सदस्य संतोष गावडे, उपगटनेत्या तथा कोळंब पस सदस्या योजना कांबळी यांनी उपस्थित राहून गटनोंदणी ठराव पत्र जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले.













