गुहागर (प्रतिनिधी): गुहागर तालुक्यातील परचुरी गावामध्ये दाभोळ खाडीच्या किनारपट्टीवर वाशिष्ठीच्या काठावर वसलेले सुफीपीर हजरत हाजी मुस्तफा शहाबाबांचा व डावलशहा वलीबाबांचा ८३९ वा उरूस शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सजरा करण्यात येणार आहे.
८४६ वषापूर्वी बगदादहून दाभोळ खाडीच्या किनारपट्टीवर येवून बसलेल्या बाबांचा उरूस, मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात येतो. बाबांवर असलेली अद्धा व त्यांच्याकडून पूर्ण होणाऱ्या नवसामुळे भाविकांचा लोंढा येते सतत सुरू असतो. गुहागर तालुक्यासह जिल्हाभरातून तसेच इतर ठिकाणहून सर्व धर्मिय हजारो भाविक बाबांच्या उरूसासाठी व संदलासाठी हजेरी लावतात. नवसाला परिपूर्ण करणारे बाबा म्हणून त्यांची ख्याती असल्यामुळे भाविकांचा लोंढा आता दिवसेंदिवस वाढतच आहे. बाबांच्या उरूसाच्या रात्री सर्व भाविकांना इफतारी व्यवस्था तसेच ७:३० ते १०:३० भोजन (नियाज) व्यवस्था केलेली आहे. तरावी नमाज नंतर रातीब व संदल निघणार आहे. तसेच या ठिकाणी मस्तानीसह लेझीम इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
बाबांचा हा उरूस आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी स्थानिक जमातीचे अध्यक्ष फरिदभाई चोगले व त्यांचे सर्व सहकारी विशेष परिश्रम घेतात. तरी या उरूसाच्या नियाजीचा आणि संदलाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन फरिदभाई चोगले व संयोजकांतर्फे करण्यात येत आहे. हाजी बाबांचा उरूस पवित्र रमजान महिन्यात साजरा होत असल्याने रोजेदारांसाठी इफतारी तसेच नियाज (भोजन) व पहाटे ४:०० वाजता दर्गा शरीफवर चादर चढविल्यानंतर सहेरीची (रोजा) व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आलेली आहे.













