मधमाश्यांच्या हल्ल्यात पाच ते सहा नागरिक जखमी

मालवण शहरातील देऊळवाडा येथील घटना : मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू : बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व सामाजिक कार्यकर्ते मोहन वराडकर यांच्याकडून जखमींची विचारपूस

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील देऊळवाडा येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
जखमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात डॉ. बालाजी पाटील व वैद्यकीय पथकाने उपचार केले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, माहिती मिळताच बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व सामाजिक कार्यकर्ते मोहन वराडकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

मालवण देऊळवाडा येथे झाडावरून मधमाश्याचे पोळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराच्या अंगावर कोसळले. यात दुचाकीस्वार जखमी झाला. यांसह एका मुलासह पाच ते सहा जणांना मधमाश्यानी जखमी केले. जखमीना मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी पाटील यांनी उपचार केले.