बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांच्याकडून विकास कामांची पाहणी

मेढा येथे काँक्रीट गटार बांधकामाची केली पाहाणी

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मेढा येथे मुरलीधर मंदिर ते राम मंदिर या मार्गांवर काँक्रीट गटार बांधकामाचे काम सुरू आहे. बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांनी या ठिकाणी पाहणी करून दर्जेदार कामाबाबत बांधकाम प्रशासनास सूचना दिल्या.

यावेळी बांधकाम समिती सदस्य नगरसेवक मंदार ओरसकर, नगरपरिषद कर्मचारी राजा केरीपाळे यांसह बांधकाम कामगार उपस्थित होते.

नागरिकांना सेवा सुविधा मिळण्याच्या दृष्टीने होत असलेली विकास कामे ही दर्जेदार पद्धतीनेच झाली पाहिजेत. कामात कुठलीच तडजोड असता नये. हीच आपली भुमिका आहे. त्या दृष्टीने होत असलेल्या विकास कामांच्या ठिकाणी पाहणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.