प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: इराण-इस्त्रायल युद्धामुळे दुबईत अडकलेल्या कोल्हापुरातील हुपरी येथील २५ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. एतिहाद एअरवेजच्या विशेष विमानाने हे सर्वजण मंगळवारी मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर हुपरीला परतले. हॉटेलजवळ ड्रोन हल्ला झाल्यामुळे ते तणावात होते, मात्र भारतीय आणि संयुक्त अरब अमिराती प्रशासनाच्या मदतीने ते सुखरूप परतले.
आखाती देशांतून उडाण घेतलेल्या दोन विमानांपैकी एका विमानामध्ये हा कोल्हापूरचा ग्रुप होता. हा ग्रुप दुबईमध्ये ज्या ठिकाणी राहायला होता त्या हॉटेलच्या आजूबाजूला देखील हल्ले झाले होते. जीव मुठीत घेऊन हा ग्रुप आबुधबीला बाय रोड बाहेर पडला.दिलगिरी व्यक्त करत दुबई प्रशासनाने या ग्रुपमधील प्रत्येकाला २६ हजार रुपये गिफ्ट दिले होते.













