दारूच्या नशेत भावाचा धिंगाणा; वडिलांसह बहिणीला मारहाण

कणकवली : सिद्धार्थ नगर परिसरात कौटुंबिक वादातून मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणी सायली संतोष जाधव (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, दुपारी सुमारे १:३० वाजता आरोपी स्वप्नील संतोष जाधव (वय ३४) हा दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी त्याने घरात शिवीगाळ करत गोंधळ घातला. तसेच शिळे अन्न देतेस असे म्हणत बहिणीसोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर वडील संतोष जाधव हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता आरोपीने संतापाच्या भरात घरातील जंगली लाकड्याने वडील व बहिणीला मारहाण केली. या मारहाणीत वडिलांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी बहीण सायली संतोष जाधव हिने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस तपास करत आहेत.