बांदा : प्रतिनिधी
इन्सुली खामदेव नाका येथे गाडीच्या खिडकीमधून बाहेर पडल्यामुळे चार वर्षाचा चिमुकला जागीच मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शौर्य सचिन तुयेकर (वय ४, रा. चराठा सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीत गाडी कोसळल्यामुळे ही घटना घडली. यात इतर कुटुंबांला देखील किरकोळ दुखापत झाली आहे
बांदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चिमुकल्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.











