तवसाळ गाव पंचक्रोशीचा नेत्रदिपक शिमगोत्सव सोहळा जल्लोषात साजरा.

गुहागर – तवसाळ

तवसाळ गाव पंचक्रोशी मधिल तांबडवाडी-बाबरवाडी,तवसाळ खुर्द,तवसाळ पडवे,तवसाळ मोहीतेवाडी,तवसाळ आगर (रोहीले) तांबडवाडी बौध्दवाडी,तवसाळ बौध्दवाडी २ वाड्या अशी तवसाळ मोहल्ला / तवसाळ पडवे मोहल्ला सर्व समाज कायम गावा सोबत असतात. एकुण १२ शिमगे चे होम असतात,९ होम प्रत्येक ठिकाणी होतात. तर ३ होम आई श्री महामाई सोनसाखळी च्या चरण स्पशाने शिमगोत्सवाची अनेक वर्षांपासून परंपरा चालीरिती होम साजरे होत असतात.

दि. 2 मार्च 2026 रात्री उशिरा देवांना रुपे लाऊन पाळखीत विराजमान करण्यात आले. आई श्री महामाई सोनसाखळी मंदिर परिसरात रात्री १२ वाजता होमाला आग लावण्यात आला आणि १० वा होम प्रारंभ झाला . श्री महामाई सोनसाखळी देवीचे मानकरी श्री राजेश रमेश गडदे, तवसाळ गावाचे खोत,गावचे सर्व गावकरी,मानकरी वरिष्ठ सर्व तवसाळ गाव पंचक्रोशीतील चतुरशिमा मधिल ग्रामस्थ उपस्थित होते. तर कर्दै गावचे पुजारी गुरव परिवार यांची आई श्री महामाई सोनसाखळीची पुजा वडिलोपार्जित पासुन मनोभावे सेवा करत आले आहेत.

दि. 3 मार्च 2026 सकाळी गावातील सर्व भाविक दर्शनासाठी आलेल्यावर सकाळी ९ वाजता येतात पालखी मंदिर परिसरातील सहानेवर बसवलेली असते, पालखी रात्रभर बाहेर असते मंदिर सकाळी परिसरात दर्शनासाठी भाविक येतात. छोटं जत्रेचे स्वरूप येते. त्या नंतर गावाच्या मुख्य ठिकाणे तवसाळ खुर्द घेऊन आल्यावर देवीची परंपरा हळदी कुंकू कार्यक्रम असतो संपूर्ण परिसरातील घरं घेतली जातात पहाटे उशिरा पर्यंत घरोघरी जाऊन हळदी कुंकु कार्यक्रम आटोपल्यावर
दिनांक 4 मार्च 2026 रोजी सकाळी उशीरा पालखी गावाच्या सहाने वरती ठेवण्यात आली. तर सकाळी ठिक १० वाजता सर्वांत मोठा शिमगोत्सव
तवसाळ खुर्द पंचक्रोशीत मोठी जत्रा भरते
परंपरेचा आजही जागर करत आहेत.
देवी आपल्या बहीनीला जयगड खाडी येथे फेरी बोटीतून *स्मशानभुमीमार्गे होमावर* अक्षय तृतीया नंतर पाडव्याला जाताना फेरी बोटीतून बहाणीचीभेट घेत नारळ अर्पन करुन जाते अशी (अख्यायिका ) आहे ,आणि परत आल्यावर वरती तिथे ११ वा देवीचा होम होतो. पालखी समुद्रात परंपरेन परत आल्यावर होमा भोवती प्रदक्षिणा पूर्ण करुन दरवर्षी प्रमाणे श्री महामाई सोनसाखळी साऊंड सर्विस व भव्य दिव्य मंडप गणेश सागवेकर यांच्या वतीने उभारण्यात आला होता.भव्य दिव्य मंडप सजावट असते. इथे सर्व समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम संपन्न होतं असतो. ( जाती भेदाला कोकणात थारा नाही ) अशीच एकजुट टिकून आहे.
पारंपारिक देवीची आराधना ( तमाशा नृत्य ) भंडारी साज पेहराव करून यांचा अफलातुन बाज मृदूंगाचा तालावर, घुंगराच्या आवाजात,रंगतो ” तमाशा”ही लोक कला सादर केली जाते. अलोट गर्दी पहायला मिळते.पालखी येथे खास नाचविण्याचा कार्यक्रम असतो. पुढे रूढी परंपरा नुसार रोहीले बीच (तवसाळ आगर )येथे पालखी घेऊन नाचविण्याचा कार्यक्रम असतो. अनेक भाविक होमा मध्ये नारळ अर्पण करतात. देवीचा १२ वा होम संपन्न झाल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होते.इथे छोटेखानी जत्रा भरते तवसाळ आगर (रोहीले )येथे आनतात, त्या नंतर थेट तवसाळ खुर्द ( सहानेवरती ) येथे पालखी बसवली जाईल ती दिनांक 19 एप्रिल 2026 (अक्षय तृतीया ) पर्यंत त्या नंतर गावातील सर्व घरामध्ये देव दर्शन दर्शनासाठी सुरुवात होते.

या शिमगोत्सव नेत्रदिपक सोहळ्याचे उत्तम फोटोग्राफी, व्हिडिओ करणारे प्रणय सुर्वे, अमोल पाटिल, यश मोहिते यांचे विशेष अभिनंदन.