जिल्हाधिकारी यांनी न्यायलायचा अवमान केल्याचा आरोप
गुहागर प्रतिनिधी:
तीस वर्षांपासुन निरामय हॉस्पिटल बंद असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा स्थानिकांचा आरोप असून जिल्हाधिकारी यांनी न्यायालयाचा अवमान केला असून प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहेत असा गंभीर इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आणि अंजनवेल – बोरभाटले – कातळवाडी या ग्रामस्थ मंडळाचे सरचिटणीस यशवंत सोनू बाईत, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त विठ्ठल (बावा) भालेकर यांनी गुहागर तालुक्यातील कातळवाडी – बोरभाटले येथील सहाण येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
सामाजिक कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त यशवंत सोनू बाईत आणि विठ्ठल (बावा) भालेकर पुढे म्हणाले की, उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांना देखील निरामय हॉस्पिटल सुरु करण्यात अपयश आले आहे.रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी आरोग्य समितीची बैठक न लावल्यास जिल्हाधिकाऱ्यांचे विरोधात न्यायालयात जाणार असा गंभीर इशारा देण्यात आला असून ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टीमेटम दिल्याची माहिती यशवंत सोनू बाईत, विठ्ठल (बावा) भालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.











