बांदिवडे येथे नशा मुक्त भारत अभियान !

मसुरे | झुंजार पेडणेकर : नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन बांदिवडे शाळा येथे करण्यात आले होते. यावेळी ब्रह्मकुमारी शोभा बहेनजी (गोवा-सिंधुदुर्ग संचालिका),ब्रह्माकुमारी डॉ. वैशाली बहेनजी (कोल्हापूर-तासगाव संचालिका),ब्रह्माकुमारी सुवर्णा (राठिवडे संचालिका) येई मार्गदर्शन केले. यावेळी बांदिवडे नं.१ शाळेचे मुख्याध्यापक श्री. राम निमकर, पदवीधर शिक्षिका श्रीम. प्रियंका सूर्यवंशी, बांदिवडे मळावाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विकास राठोड, बांदिवडे पालयेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. गीतांजली महाले, बांदिवडे आरोग्य केंद्राच्या आशा सेविका शामल आईर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री. सत्यवान सावंत, अंगणवाडी सेविका श्रीमती सावंत , श्रीमती पवार , श्रीमती मयेकर , तिन्ही शाळेचे सर्व विद्यार्थी,सौ.आईर तसेच ग्रामस्थ सुभाष परब या वेळी उपस्थित होते.