डोंबिवली येथे ‘नारी इन सारी ‘ मॅरेथान स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

पलावा योग परिवार , पलावा फेज ०२ यांच्या वतीने आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर आदरणीय वीरमाता झाँशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून पलावा योगपरिवाराने, पलावा फेज ०२, डोबिवली पूर्व येथे ‘नारी इन साडी’ या ०३ व ०५ कि.मी. धावणे ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेसाठी पलावातील १८ ते ७० वयोगटातील २१३ माताभगिनी पारंपरिक नऊ वारी साडी, मुंडासे, ढाल-तलवार तसेच भाले स्पर्धेत सहभागी होत स्पर्धेला एका उंचीवर नेत स्पर्धा यशस्वी केली.

ह्या स्पर्धेत ०५ कि.मी. गटात प्रथम क्रमांक प्रणिता बाळकृष्ण थळे, व्दितिय क्रमांक अर्चना रहाटडे व तिसरा क्रमांक सिमरन विक्रम तोरवी ह्यानी पटकाविला. तर ३ कि.मी. गटात प्रथम क्रमांक आकांक्षा सिंह, व्दितीय क्रमांक दुर्गा पाटीदार व तिसरा क्रमांक आरती प्रिया हिला मिळाला.

कार्यक्रमासाठी विशेष अतिथी निकेत सिंग, नितेश सिंग, दिनानाथ ओझा, अशोक दाभोलकर- मेस्त्री, तसेच श्रीमती विणा चौव्हाण, मंजू ओझा, चित्रा भटनागर उपस्थित होते. त्यांचे शुभहस्ते विजेते महिलाना पुरस्कार तसेच सर्व सहभागी सर्व महिलाला मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले.

‘ नारी इन सारी’ हा उपक्रम राबवताना श्री. आनंदसरांच्या मार्गदर्शनाखाली पलावा योग परिवारातील आनंद चव्हाण, अक्षय गुप्ता अंकुश गुप्ता, अजय केसरवानी, जिविका हरणे, सोनिया माने, आरती प्रिया उदिता पांडे ह्यानी अतोनात मेहनत घेतली. तसेच सिल्वर पर्ल, ब्युटी सिक्रेट्स, सपना ब्युटी सलून व आय लव्ह पलावा ह्यानी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास बहुमूल्य सहकार्य केले.