भजनसम्राट संतोष कानडे यांची उद्या प्रहार डिजीटलवर विशेष मुलाखत !

भजनसम्राट संतोष कानडे यांची आज प्रहार डिजीटलवर विशेष मुलाखत !

भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आणि निर्भिड पणे अनेक गोष्टी व्यक्त करणारे लोकप्रतिनिधी म्हणून समाजप्रिय असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संतोष कानडे ..
अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात वडिलांना मला भजनी बुवा म्हणून नावलौकिक मिळवायचा आहे असा विचार करून खडतर तपश्चर्या करत लौकिकाला साजेशी कामगिरी करताना कानडे बुवा यांनी आपलं वेगळेपण सिद्ध केले.
कबड्डी सारख्या खेळात आपलं कौशल्य दाखवून जिल्हा स्तरावर आपली चमक दाखवत अनेकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी झटणारे कानडे बुवांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
दशावतार नाटक या हि कला प्रकाराला आपला श्वास मानुन अनेक दर्जेदार नाटके सादरी करण करण्यासाठी त्यांनी आपल्या गावातही नाट्य प्रयोग सुरू केले.
वारकरी संप्रदाय यांचे पारंपरिक पद्धतीने जतनासाठी त्यांनी वेगवेगळ्या वारकरी भजने, वारकरी चक्री भजन असे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले.
स्पष्ट वक्तेपणा,हजर जबाबी पणा, नाविण्यपूर्ण बदल आणि प्रयोग शिलता संभाळून आपले लोकप्रतिनिधीत्व सिध्द करणाऱ्या या बुवांनी कृषी विषयी जाणिवेतून शेती हि फुलवली आहे.
अशा विविध पैलूंवर जाणुन घेण्यासाठी भजनसम्राट कानडे बुवा अनुभवा प्रहार डिजिटल च्या मुलाखत सत्रात उद्या रविवार ३० जुलै रात्री ठिक ८ वाजता प्रदर्शित होणार आहे.हि प्रहार डिजिटलसाठी मुलाखत घेतली आहे प्रसिद्ध निवेदक प्रा. वैभव खानोलकर यांनी..