गोकुळ निवडणुकीच्या आखाड्यात ए.वाय.पाटील यांची हसन मुश्रीफ यांच्यासोबत युती…

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना धक्का…

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय.पाटील यांनी आता महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटातून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे गोकुळ’च्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का दिला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांना राधानगरी मधून मोठे मताधिक्य दिले होते.तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिलेले ए.वाय.पाटील यांनी सतेज पाटलांची साथ सोडली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर आताच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासोबत राहून राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन जागाआणि पंचायत समितीच्या सहा जागांवर विजय मिळवत राधानगरी तालुक्यात ए.वाय यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते.

त्यामुळे आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ए. वाय.पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत रहीलतील असा अंदाज राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात होता.मात्र स्थानिक पातळीवरील तसेच सहकारातील राजकारण वेगळे असा निर्णय घेत ए. वाय.पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.याआधी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ मध्ये संधी दिली होती.मात्र कार्यकर्त्यांनी ए. वाय.यांची साथ सोडत माजी आमदार के.पी.पाटील यांच्या गटात प्रवेश केला होता.मात्र आता स्वतः ए.वाय.पाटील हे गोकुळ’च्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.