रामकंद नावाचे फळ खाल्याने वृद्ध महिला अस्वस्थ

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तिडे-निमदेवाडी (ता. मंडणगड) येथील वृद्ध महिलेने रामकंद नावाचे फळ खाल्याने तिला विषबाधा झाली. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.

लक्ष्मी पांडुरंग निमदे (६८, रा. निमदेवाडी-तिडे, ता. मंडणगड, रत्नागिरी) असे विषारी फळ खाल्लेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. लक्ष्मी निमदे हिने सकाळी रामकंद या नावाचे फळ खाल्ले काही वेळानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दापोली येथे दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.