रत्नागिरी:
जी. एम. शेट्ये हायस्कूल, बसणी. येथे आज दिनांक 07/03/2026 रोजी आदर्श विध्यार्थी पुरस्कार व बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री नाईक सर यांनी केले.
प्रत्यकवर्षी सौ.अलका नामदेव शेट्ये यांचे स्मरणार्थ आदर्श विध्यार्थी पुरस्कार प्रदान केला जातो. शैक्षणिक वर्ष 2025-26 चा पुरस्कार इयत्ता 10 वी चा विध्यार्थी कु. सार्थक सुरेश बाचरे या विध्यार्थ्याला मिळाला.या पुरस्काराचे वितरण संस्थेचे अध्यक्ष मा.अँड. अविनाश (भाऊ) शेटे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.
बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.अँड. अविनाश (भाऊ) शेटे साहेब अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना आदर्श विध्यार्थी कसा असावा याबाबतचे विविध पैलू सांगत सार्थकने पुढे सामाजिक,शैक्षणिक व राजकीय जीवनात एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे सचिव माननीय प्रसादजी (बापू ) गवाणकर साहेब यांनी सार्थकच्या कलेची स्तुती करत त्याला जे. जे. आर्ट स्कूल, मुंबई येथील शिक्षणासाठी सहकार्य करण्याचा शब्द दिला.मा. जयवंत कदम गुरुजी यांनी सार्थक बद्दल संस्थेच्या अनेक अपेक्षा असून तो नक्की पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
शाळेत झालेल्या शालेय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. इयत्ता 10 वी मधील बालकवी कुमारी श्रेयश्री लोंढे हिचा सत्कार करण्यात आला. 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील महिला शिक्षकांचे सत्कार श्री जाधव सर यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. धांगडे साहेब, खजिनदार मा. बंधू मयेकर साहेब, श्रीमती मयेकर मॅडम व सागर शेट्ये सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पंडित मॅडम यांनी केले. तर आभार श्री जाधव सर यांनी मानले.












