न्यूझीलंडवर 96 धावांनी मात करत भारताचा ऐतिहासिक विजय
सुंदर पिचाईंचे मजेशीर अभिनंदन; सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता
टीम इंडियाने टी-20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत ICC पुरुष टी-20 विश्वचषक 2026 जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. या शानदार विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील अनेक दिग्गजांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनीही सोशल मीडियावरून टीम इंडियाचे कौतुक केले.
नवी दिल्ली : टीम इंडियाने रविवारी इतिहास रचत ICC पुरुष टी-20 विश्वचषक 2026 ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
या शानदार विजयामुळे देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरही टीम इंडियाच्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनीही टीम इंडियाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे सुंदर पिचाई यांनी दिलेल्या शुभेच्छा मजेशीर शैलीत असल्यामुळे त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या.
क्रिकेटप्रेमींनीही भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशाचे जोरदार स्वागत करत खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.











