तुळस येथे गवारेड्यांच्या कळपाचा दोन गाड्यांवर हल्ला : गाड्यांचे मोठे नुकसान : चार जण जखमी 

वेंगुर्ले : दाजी नाईक

वेंगुर्ले सावंतवाडी मार्गावरील तुळस येथे मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या दोन गाड्यांना गवारेड्यांच्या कळपाने धडक दिली. या दुर्घटनेत दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी संध्याकाळी उशिरा घडली आहे. तरी या गवारेड्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.