वेंगुर्ले येथील जिल्हास्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते झाले उद्घाटन
वेंगुर्ले : दाजी नाईक
नाईक जिम वेंगुर्ले आणि कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाईक जिम वेंगुर्लेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ७८ पदकांची कमाई केली. यामध्ये २८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २४ कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पॉवरलिफ्टिंग आणि डेडलिफ्ट या दोन्ही प्रकारांमध्ये ‘बेस्ट जिम इन सिंधुदुर्ग’ या मानाच्या ट्रॉफीवर नाईक जिमने आपले नाव कोरले. तसेच या दोन्ही मानाच्या ट्रॉफी कणकवली, आचरा आणि वेंगुर्ले अशा सलग तीन ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये कायम राखत नाईक जिमने हॅटट्रिक साधली आहे. या यशामुळे नाईक जिमच्या खेळाडूंनी वेंगुर्लेच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. परब यांनी वेंगुर्ले येथील नाईक जिम च्या टीमचे कौतुक केले. तसेच वेंगुर्ले शहरात सुंदर अशी जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्याने त्या स्पर्धेला शुभेच्छा देत खेळाडूंनी चांगल्या रीतीने खेळाचे प्रदर्शन करावे असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक श्री. नागेश ऊर्फ पिंटू गावडे तसेच श्री. प्रकाश नाईक, सौ. मोना प्रकाश नाईक, सौ. शर्मिला काशीराम नाईक, सौ. श्वेता अखिल आरोस्कर, श्री. अखिल आरोस्कर, श्री. संजय साटम तसेच कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग टीमचे सदस्य उपस्थित होते.
वेंगुर्ले येथील या स्पर्धेत नाईक जिमच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत व वजनगटांत उत्कृष्ट कामगिरी केली. खेळाडूंची पदकनिहाय कामगिरी पुढीलप्रमाणे :
प्रेरणा आरवंदेकर (२ सुवर्ण, २ रौप्य), श्रेया परब (३ सुवर्ण, १ कांस्य), अलिशा पालकर (४ सुवर्ण), अस्मी तल्हा (२ सुवर्ण, २ रौप्य), निधी राऊळ (३ सुवर्ण, १ रौप्य), परशुराम केसरेकर (१ रौप्य, १ कांस्य), साईराज मातोंडकर (३ रौप्य, १ कांस्य), सोहम पेंडणेकर (१ सुवर्ण, २ रौप्य), सिद्धांत पालकर (२ रौप्य), पार्थ दाभोलकर (२ कांस्य), गौरव माने (२ कांस्य), अनिश आरोस्कर (१ रौप्य, १ कांस्य), इशान तल्हा (१ रौप्य, ३ कांस्य), भूपेश वराडकर (३ सुवर्ण, १ रौप्य), गणेश बागायतकर (१ रौप्य, १ कांस्य), हितार्थ वागळे (२ सुवर्ण, २ कांस्य), रितेश वेंगुर्लेकर (१ सुवर्ण, १ रौप्य), शार्दुल खानलोकर (१ सुवर्ण, १ रौप्य), सिद्धेश शेटकर (२ रौप्य, २ कांस्य), अवधूत नाईक (१ सुवर्ण, १ कांस्य), सेजल पेडणेकर (२ सुवर्ण), फ्लेविन रॉड्रिक्स (२ कांस्य), निखिल मोरजे (२ रौप्य), पुरुषोत्तम सारंग (२ कांस्य), दीपक मडकईकर (२ रौप्य), प्रतिक तांडेल (२ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य), वेदांत पेंडणेकर (२ कांस्य) आणि प्रतीक तेंडोलकर (१ सुवर्ण) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. सचिन परुळेकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अमित प्रकाश नाईक यांनी केले. सर्व खेळाडूंना श्री. ईश्वर माने आणि श्री. अमित नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
नाईक जिमच्या खेळाडूंनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, भविष्यातही खेळाडूंनी अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम राखावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.













