रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गृहनिर्माण संस्था साठी नवे कर्ज धोरण :-अँड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी :   रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण निर्णय करत गृहनिर्माण संस्थांना *शेड बांधणी, नाविलिफ्ट बसवणे, कंपाउंड वॉल बांधणे ,कंपाउंड मध्ये पेव्हरब्लॉक्स बसवणे, वाटर प्रूफिंग करणे.इमारतीची रंगरंगोटी करणे* इत्यादी कामांसाठी मध्यवर्ती बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय करण्यात आला गृहनिर्माण संस्थेच्या नावावर ही कर्ज प्रकरण होणार आहेत.

अनेक गृहनिर्माण संस्था ना निधी अभावी आपली विकासकामे करता येत नाही अश्या संस्थांना rdcc च्या नवीन योजना लाभकारक ठरतील. गृहनिर्माण संस्थानी नजीकच्या rdcc बँक शाखेत संपर्क करून या बाबत या माहिती घ्यावी व बँकेच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन माध्यवर्ती बँकेचे संचालक अँड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.