रत्नागिरी : दि.२७ जूलै २०२३ रोज़ी सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते पीएम-किसान योजनेच्या १४ व्या हप्त्याचे वितरण शुभारंभ कार्यक्रम आडिवरे ऋषी शेट्ये यांच्या श्रीकालीकृपा कृषी केंद्र येथे प्रसारित झाला. त्या कार्यक्रमात भाजपचे नेते, राजापूर विधानसभा संयोजक दिपक पटवर्धन उपस्थित होते,तसेच भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री बाळ दाते ,कोंडसर ग्रामपंचायत उपसरपंच श्री प्रमोद वारीक ,ग्रामपंचायत सदस्य अण्णा तळये, किरण जोशी,सामाजिक कार्यकर्ते वरद गोरे ,संजय दाते,संजय काळे,प्रकाश शेमणकर,शांताराम शेडेकर,चारुहास पाध्ये, संजय पड्यार, शांताराम भोवड,बंड्याजी पावणाक,दिलीप चिपटे,अर्जुन दावडे,अजित पावणाक, अनंत शेडेकर, दत्ताराम शेडेकर, शंकर शेडेकर, भिकाजी शेडेकर, बाजी रायकर,चंद्रकांत लिंगायत,प्रसाद शेट्ये,डॉ निरंजन गोखले,संदीप दळवी, ग्राम विस्तार अधिकारी अनिल पिठलेकर अशी शेतकरी लाभार्थी उपस्थित होते,
यावेळी ऍड. दिपक पटवर्धन यांनी विशेष मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेतकरी वर्गाला सर्वोतपरी सहाय्य करण्याचा आणि त्याला भक्कम पणे उभे करण्याचा मानस आहे,तसेच विविध योजना यांची माहिती दिली,तसेच जमलेल्या शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या, किसान सन्मान योजनेचे प्रश्न समजून घेतले व यावर आपण लवकरच वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले











