लांजा : लांजा नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी दुपारी मतदानाची टक्केवारी वाढली असून १.३० पर्यंत ४९.११ % इतके मतदान झाले.
नगर पंचायत निवडणूकीसाठी मंगळवारी सकाळी मतदान करण्यासाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. त्यामुळे सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत अवघे ३२. ६० % टक्के इतके मतदान झाले. मात्र त्यानंतर दुपार सत्रात मतदानाची टक्केवारी वाढली. दुपारी १.३० पर्यंत ४९.११ % इतके मतदान झाले.
सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ६९८९ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये ३५९४ पुरुष व ३३९५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
Home महत्वाच्या बातम्या लांजा नगरपंचायत निवडणूक; दुपारी मतदानाची टक्केवारी वाढली, १.३० पर्यंत ४९.११ % मतदान












