भाजपाची नाचणे येथे झाली टिफिन पार्टी 

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी नाचणे,रत्नागिरी शहर तसेच हरचेरी गटाचा टिफीन पार्टी मेळावा बालाजी मंगल कार्यालय येथे झाला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेनुसार पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन स्वतःचा घरून आणलेले शाकाहारी पद्धतीचे जेवण करत महाविजय संकल्प २०२४ व विविध योजनांचा आढावा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने यांनी घेतला. या टिफीन बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव मयेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. ऐश्वर्या ताई जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश शेवडे, विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.

या बैठकीमुळे कार्यकर्त्यांनमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात सर्व निवडणुका जिंकण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.