गावखडी / वार्ताहर:
साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी याप्रमाणे असणारे रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र शिरसेकर आणि त्यांची पत्नी सौ संजीवनी जितेंद्र शिर्सेकर.आज सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र शिर्सेकर आणि त्यांची पत्नी सौ संजीवनी जितेंद्र शिर्सेकर यांनी आपल्या विवाह वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने अनेकांचे शुभ आशीर्वाद मिळावेत आपण ज्या समाजात राहतो त्या समाजा ला काहीतरी सामाजिक बांधिलकी हा उद्देश समोर ठेवून 65 वर्ष असणाऱ्या महिलांना 100 महिलांना ब्लॅंकेट देऊन एक मायेची उब मायेचा आधार दिला आहे प्रत्येक माणूस आपला वाढदिवस मोठा खर्च करून प्रचंड खर्च करून मोठ्या दिमाखात साजरा करतात परंतु तसा खर्च वाया न जाता आपल्या पैशातून समोरच्याला आधार दिला जावा वयोवृद्धांना आधार दिला जावा वयोवृद्धांसाठी काहीतरी सामाजिक बांधिलकीतून करता यावे या दृष्टीने त्यांनी सर्वांना शंभर ब्लँकेट दिले.
आज वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे वृद्धांना आधार मिळावा त्यांना सन्मानाची वागणूक दिली जावी या हेतूने हा वाढदिवसाचा उपक्रम श्री जितेंद्र शिर्सेकर यांनी आपल्या विवाह वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता.
गेली अनेक वर्षे ते सामाजिक कार्य करत आहेत समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत हा त्यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे जितेंद्र शिर्सेकर यांनी गेली पाच वर्षे शिवार आंबेरे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे उपसरपंच म्हणून दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून दहा वर्षे त्यांची पत्नी सौ संजीवनी जितेंद्र शिरसेकर यांनी दहा वर्षे शिवार आंबेरे सरपंच पद सांभाळले आहे आज त्यांनी आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक नवीन आदर्श उभा केला आहे त्याबद्दल सर्वत्र रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
आपल्या 25 व्या विवाह वाढदिवसानिमित्त श्री जितेंद्र शिर्सेकर.यांनी ब्लॅंकेट वाटप केले याप्रसंगी शिवार आंबेरे पोलीस पाटील श्री.सुरेश लक्ष्मण नाटेकर, गोपाळ रोकडे,दयानंद लाखण,राम गुरव ,महिला उपस्थिती होती.
Home महत्वाच्या बातम्या जितेंद्र शिर्सेकर व सौ.संजीवनी जितेंद्र शिर्सेकर यांच्या लग्नाच्या आगळावेगळा वाढदिवस












