कणकवलीत नेरूर वाघचौडीच्या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली : कणकवली शहरातील गाव होळी चवाटा येथे शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजता पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नेरूर वाघचौडी (ता. कुडाळ) येथील मांडेश्वर / मोरेश्वर मित्र मंडळ तसेच तेथील ग्रामस्थ व मानकरी सहभागी होणार असून ते आपल्या पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम सादर करणार आहेत.

 

कोकणातील वैभवशाली लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून कणकवलीकरांना मिळणार आहे. नेरूर वाघचौडी येथील ग्रामस्थांकडून सादर होणारा हा पारंपरिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार असून मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

तरी कणकवली शहरातील सर्व भाविक, ग्रामस्थ व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कोकणच्या समृद्ध परंपरेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.